भारताच्या सीमाभागात चीनने हजारो घरे बांधली आहेत. यामागे कुरापतखोरी आहे; त्याचप्रमाणे आक्रमक विस्तारवाद आहे. यातील काही घरे भारताच्या भूमीवर आहेत का, हे अजून समजलेले नाही. यावर भारताचे उत्तर काय, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारताच्या सीमाभागात चीनने हजारो घरे बांधली आहेत. यामागे कुरापतखोरी आहे; त्याचप्रमाणे आक्रमक विस्तारवाद आहे. यातील काही घरे भारताच्या भूमीवर आहेत का, हे अजून समजलेले नाही. यावर भारताचे उत्तर काय, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या दोन वर्षांत भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमेलगत चीनने नवी गावे वसवल्याचे उपग्रहातील प्रतिमा आणि प्रकाशित वृत्तांद्वारे समोर आले आहे. त्यापैकी काही गावे चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या भूतान आणि भारतीय प्रदेशाच्या आत आहेत. उदाहरणार्थ, डोकलाम या भारत, भूतान व चीनच्या तिठ्यावर पूर्वेकडे दहा किलोमीटरवर भूतानच्या प्रदेशातील तोरसा नदीलगत सन २०२०मध्ये चीनने पांगता हे गाव उभारले. अरुणाचल प्रदेशच्या सबन्सारी जिल्ह्याच्या वरच्या भागात उत्तरेकडे, त्सारी-छू नदीलगत चीनने शंभर घरांचे एक गाव वसवले आहे. हे काही भारताच्या सीमेलगत चीनने वसवलेले एकमेव गाव नव्हे, तर भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमांलगत वसवत असलेल्या ६२८ गावांपैकी एक आहे.
Comments